in

पंकजा मुंडे यांनी लुटला दांडियाचा मनमुराद आनंद

विकास माने, बीड | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज परळी मध्ये दांडियाचा मनमुराद आनंद लुटलाय. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी पंकजा मुंडेंचा हा गरबा चांगलाच चर्चेत आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात आले, यानंतर बीडसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी परळी गाठली. दसऱ्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिले असताना परळीत कार्यकर्त्यांच्या आग्रहखासतर पंकजा मुंडेंनी दांडियाचा मन मुराद आनंद लुटला आहे. यावेळी चिमुकल्या बरोबर गरबा खेळत पंकजा मुंडेंनी त्यांच्याशी संवाद साधला आहे.

पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.येत्या 15 तारखेला त्यांच्या उपस्थित भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. तत्पूर्वी पंकजा मुंडेंचा हा गरबा चांगलाच चर्चेत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संत्र्याला १ लाख रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई द्या- अनिल बोंडे

Maharashtra Corona | राज्यात २ हजार २१९ नवीन बाधित