in

‘अंबाजोगाईची घटना दुर्दैवी; दुःख व्यक्त करू की संताप करू समजेना’ पंकजा मुंडे

बीडच्या अंबाजोगाईत 22 मृतदेहांना एकाच ॲम्बुलन्समध्ये कोंबून नेण्याचा प्रकार, हा अतिशय दुर्दैवी असून यावर दुःख व्यक्त करू की संताप व्यक्त करू समजना. अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी दिलीय. याविषयी स्वाराती रुग्णालयाच्या डीनशी बोलले असताना, त्यांनी याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन अम्ब्युलन्सची मागणी केल्याचं सांगितलं. हे अतिशय दुर्दैवी असून स्वतःची जबाबदारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर ढकलली. कलेक्टरांना प्रश्न केला तर त्यांचं असं झालंय की ते बोलुचं शकत नाहीत. अशी प्रतिक्रिया अंबाजोगाईच्या घटनेवरून भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी दिलीय. दरम्यान “कलेक्टरांचं असं झालंय की ते बोलुचं शकत नाहीत” पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा रोक नेमकं कुणाकडं ? याविषयी आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंह यांच्यावर पोलीस अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

येत्या 48 तासात राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता