in

परळीच्या रुग्णालयातील ऑक्सिजनसाठा संपला

बीडच्या परळी मध्ये आज सकाळपासूनच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. ऑक्सीजनसाठा संपल्याने रुग्णांचे हाल होऊ लागलेत, त्यामुळे नवीन गंभीर रुग्णांना ऍडमिट करून घेण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. केवळ रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जातायत, डॉक्टरांकडून आरोग्य प्रशासनाकडे ऑक्सीजनची मागणी केली जातेय. मात्र सध्या तरी हा पुरवठा सुरळीत झालेला नाहीये. प्रशासन देखील हतबल झाले असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. तर गंभीर रुग्णांना इतरत्र हलवण्यासाठी रुग्णांची धावाधाव होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ambajogai Oxygen Shortage | अंबाजोगाईमध्ये ऑक्सिजनचा अभाव,6 रुग्णांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांनी केला आरोप

भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना जामीन मंजूर