in

परमबीर हे विरोधकांची ‘डार्लिंग’; शिवसेनेचा निशाणा

परमबीर सिंग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर विरोधक निशाणा साधीत आहेत. परमबीर हे विरोधकांची ‘डार्लिंग’ झाले आहेत महाविकास आघाडी सरकारजवळ आजही चांगले बहुमत आहे. बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल. हा इशारा नसून वस्तुस्थिती आहे,अशी आक्रमक भूमिका आजच्या सामना अग्रलेखातून मांडत विरोधकांवर निशाणा साधला आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या पत्राने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. सरकार एखाद्या अधिकाऱ्यामुळे येत नाही किंवा कोसळत नाही. असं अग्रलेखात म्हटलं आहे. यासोबतच “महाराष्ट्रात चार कोंबड्या व दोन कावळे विजेच्या शॉक लागून मेले, तरी केंद्र सीबीआय किंवा एनआयए पाठवेल”, असा टोलाही शिवसेनेनं मोदी सरकारला लगावला आहे. “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अगदी बेभरवशाचे अधिकारी आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असे भारतीय जनता पक्षाचे मत कालपर्यंत होते, पण त्याच परमबीर सिंग यांना आज भाजप डोक्यावर घेऊन नाचत आहे.”सचिन वाझे यांना हटवून काय फायदा? पोलीस आयुक्तांना हटवा” अशीच भाजपाची मागणी होती.

आता त्याच परमबीर सिंग यांना खांद्यावर घेऊन भाजपावाले लग्नाच्या वरातीत नाचावे तसे बेभान होऊन नाचत आहेतपरमबीर सिंग यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांचा उद्रेक समजू शकतो, मात्र शासनाच्या सेवेत अत्यंत वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्तीने असा सनसनाटी पत्रोपचार करणे नियमात बसते काय? गृहमंत्र्यांवर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहायचे व ते प्रसिद्धी माध्यमांना पोहोचवायचे हे शिस्तीत बसत नाही. परमबीर सिंग हे नक्कीच एक धडाकेबाज अधिकारी आहेत. त्यांनी अनेक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडल्या. सुशांत राजपूत प्रकरणात त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चांगला तपास केला.हे खरे असले तरी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने असे पत्र लिहून सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही.गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला शंभर कोटी रुपये गोळा करून द्यायला सांगितले. मुंबईतील 1750 बार-पबमधून हे पैसे उभे करावेत असे गृहमंत्र्यांचे म्हणणे होते, पण गेल्या दीडेक वर्षात मुंबई-ठाण्यातील पब्स-बार कोरोनामुळे बंदच आहेत. त्यामुळे हे इतके पैसे कुठून गोळा होणार, हा प्रश्नच आहे. असे देखील सामन्याच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

सरकारला फक्त बदनामच करायचे असे नाही, तर सरकारला अडचणीत आणायचे असे त्यांचे धोरण आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन मोदी-शहांना भेटतात व दोन दिवसांत परमबीर सिंग हे असे पत्र लिहून खळबळ माजवतात. त्या पत्राचा आधार घेऊन विरोधी पक्ष जो हंगामा करीत आहे हा एक कटच असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारजवळ आजही चांगले बहुमत आहे. बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल. हा इशारा नसून वस्तुस्थिती आहे. एखाद्या अधिकाऱ्यामुळे सरकारे येत नाहीत व कोसळत नाहीत, हे विरोधकांनी विसरू नये!,” असा इशारा शिवसेनेनं भाजपाला दिला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol Diesel Rate Today | पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ, पाहा आजचे दर

दिल्लीत ‘काका मला वाचवा’ असा आवाज येत असेल ; भाजपाचा राष्ट्रवादीला टोला