in

परमबीर सिंह यांनी केली सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या प्रकरणाची राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले असताना आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेमध्ये मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, अशी परमबीर सिंह यांची मागणी आहे. पुरावे नष्ट होण्याआधी या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करण्यात यावी असं परमबीर यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतही परमबीर यांची बाजू मांडणार आहेत. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे आणि सोशल सर्व्हिस ब्रांचचे एसीपी संजय पाटील यांना महिन्याला 100 कोटी रूपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं. याआधी 24-25 ऑगस्टला गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी अनिल देशमुख यांच्या गैरवर्तनाबद्दल पोलीस महासंचालकांना माहिती दिली होती असं परमबीर यांनी म्हटलं आहे. पोलीस महासंचालकांनी ही माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना दिली. टेलिफोनिक इंटरसेप्शनच्या आधारे ही माहिती पुढे आली होती. अनिल देशमुख यांच वागणं त्यांच्या पदाचा गैरवापर आहे. अनिल देशमुख यांच्या गैरवर्तनाची सीबीआय चौकशी करावी असं परमबीर यांचं म्हणणं आहे.

परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत अनिल देशमुख यांच्या गैरवर्तनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर 17 मार्चला परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आल्याचं त्यांनी याचिकेत नमूद केलंय.

परमबीर सिंह यांची बदली केल्यानंतर, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांकडून अक्षम्य चुका झाल्याने सिंह यांची बदली केल्याचं वक्तव्य केलं होतं. परमबीर सिंह यांनी याचिकेत, माझी बदली द्वेषपूर्वक झाल्याचं म्हटलं आहे. “माझ्याविरोधात एकही पुरावा नसताना. चौकशीसाठी कोणाची नोटीस नसताना” माझी बदली करण्यात आल्याचं परमबीर सिंह याचिकेत म्हटले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली असं पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
जवळपास आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राधा यादवचा विश्वविक्रम; टी-20त केले 50 गडी बाद

Apple कंपनीला जोरदार झटका; भरावा लागणार ‘एवढ्या’ कोटींचा दंड