in ,

परमबीर सिंग यांच्यापाठोपाठ आता वरिष्ठ पोलिसांवर खंडणीचा गुन्हा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्याही अडचणी वाढताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एका उद्योजकाने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात ६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

यामध्ये डीसीपी अकबर पठाण यांचाही समावेश आहे. श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा अगरवाल यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्यासहित काही जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

केस मागे घेण्यासाठी बिल्डरकडून खंडणी मागितल्याची आरोप परमबीर सिंग, अकबर पठाण यांच्यासह वरिष्ठ पोलिसांवर आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्यापाठोपाठ आता अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोकण रेल्वेची वाहतूक पुढील आदेशापर्यत बंद

गच्चीवरुन पूर पाहताना तोल गेला; महाडमध्ये पुराचा पहिला बळी