in

परमबीर सिंह यांच्यावर पोलीस अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

परमबीरसिंह यांच्यावर सात्यत्याने पोलिस विभागातील अधिकाऱ्यांकडून गंभीर आरोप होत आहेत. त्यात आता नागपूरमधले पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीरसिंह यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप केलाय. पोलीस निरिक्षक डांगे यांनी केलेल्या आरोपांनुसार डॉन दाऊदच्या निकटवर्तीय असलेले जितू नवलानी, छोटा शकली आणि इक्बाल मिरची आणि परमबिर सिंग यांचे सबंध आहेत. याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही डांगे यांनी केलाय. परमबीरसिंह यांनी अंडरवर्ल्डमधील गुंडांना मदत केलीय असंही डांगे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार हे पुरावे गृह विभागाला देण्यात आलेत आणि या सदंर्भात चौकशी करण्याची तयारीही सुरु झाल्याची माहितीही समोर येतेय.


परमबिर सिंग हे ठाणे येथील पोलिस आयुक्त असतांना तेथे कार्यरत असलेले भिमराव घाडगे यांचे १४ पानाचे जे पत्र समोर आले आहे. त्यातील आरोप तर अंत्यत गंभीर आहे. घाडगे यांच्या आरोपानुसार त्यांनी अवैध मार्गाने हजारो कोटी रुपयाची माया जमवली असून ती त्यांनी पत्नी, मुलगा आणि त्यांच्या काही निकटवतीयांच्या नावाने भारतासह विदेशात गुंतवणूक केली आहे. या अगोदर राज्य सराकारने परमबिर सिंग यांच्या चौकशीचे आदेश दिले असून पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी चौकशी सुध्दा सुरु केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय पांडे यांनी त्यांची चौकशी सुरु केली असून अनुप डांगे यांच्या तक्रारीची चौकशी सुध्दा सुरु झाली आहे. नुकताच समोर आलेल्या भिमराव घाडगे यांच्या तक्रारीवर सुध्दा चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

थकीत वेतनासाठी महिलांचे आंदोलन… अमित देशमुख, विजय वडेट्टीवारांचा काढता पाय

‘अंबाजोगाईची घटना दुर्दैवी; दुःख व्यक्त करू की संताप करू समजेना’ पंकजा मुंडे