in ,

‘परमसुंदरी’ ऋतुजा बागवेने नऊवारी साडीत धरला ठेका

माध्यमातून ऋतुजा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. या मालिकेत अभिनेता सुबोध भावने तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. ऋतुजा सोशल मीडियावरही सक्रीय आहे.

अलिकडेच ऋतुजाने घटस्थापनेनिमित्त इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून तिला पसंती मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये तिने मराठमोळ्या पद्धतीने साजशृंगार केला असून नऊवारी साडी नेसली आहे. विशेष म्हणजे मराठमोळ्या पद्धतीने तयार झालेल्या ऋतुजाने ‘परमसुंदरी’वर इन्स्टा रिल केलं आहे. त्यामुळे सध्या तिच्या या व्हिडीओची चर्चा सगळीकडे सुरु आहे.

“आज घटस्थापना.. आज पासुन नवरात्र उत्सव सुरू होत आहे..नटायची,सजायची व उत्सव साजरा करण्याची वेळ आता आली आहे.. मी पारंपारिक मराठी थाटात सजलीये..हाताने विणलेल्या नऊवारी पैठणी साडीचे तेजच वेगळे! नवरात्रीचा पहिला दिवस देवी – शैलपुत्रीचा. आजचा रंग पिवळा..हे निसर्गाची शक्ती, तेज व आनंदाचे प्रतीक आहे. आपण स्त्रीत्व साजरे करत असताना शक्तीचा आदर करूया आणि दुर्गा मातेचे आशीर्वाद घेऊया”, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमिताभ यांना नात आराध्याने दिल्या शुभेच्छा; एश्वर्याने केला फोटो शेअर

लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, कोव्हॅक्सिनला आपत्कालीन मंजुरी