in

मुंबईतील वांद्र्यात इमारतीचा काही भाग कोसळला; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी

वांद्र्यात चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला असून ही इमारत रात्री दीडच्या सुमारास कोसळली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलीस अधिकारी मदतीसाठी पोहोचले. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मुंबईत पाऊस सुरू असल्यानं बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. ढिगाऱ्याखाली कोणी अडकलं आहे का याचा शोध अग्निशमन दलाचे कर्मचारी घेत आहेत. खेरवाडी परिसरात असलेल्या चार मजली इमारतीचा काही भाग मध्यरात्रीच्या सुमारास कोसळला. तो काही घरांवर कोसळल्यानं परिसरात एकच गोंधळ उडाला. आतापर्यंत १७ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली असून पाच जण जखमी झाले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona | राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे…

Maharashtra Unlock | आजपासून तुमच्या शहर, जिल्ह्यात काय सुरु काय बंद!