in

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर नाशकात अंशत लॉकडाऊन

राज्यासह नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अंशत लॉकडाऊनचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे उद्या शनिवार आणि रविवारी बाजारपेठा पूर्णत बंद असणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे आणि अधिकाऱ्यांसोबत कोरोना आढावा बैठक घेतली आहे. यावेळी नाशिकमधील वाढता कोरोना आटोक्यात आणण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी नियमांबाबत जनजागृती करा, नागरिकांना कोरोनाच्या धोक्याचं महत्व पटवून द्या असे आदेश दिले.

दरम्यान या बैठ्कीनंतर नाशिकमध्ये अंशत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये उद्या शनिवार, रविवारी बाजारपेठा पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी पुढील दोन दिवसीय अंशतः लॉकडाऊनला सहकार्य करण्याचं प्रशासनाने आवाहन केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

RippedJeansTweet | फाटलेल्या जीन्स प्रकरणावरून मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा माफीनामा

अँटिलिया स्फोटक प्रकरण केवळ प्रसिद्धीसाठी?