in

शरद पवारांना दोन प्रकरणे प्रथमदर्शनी वाटली गंभीर, पण नंतर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज (22 मार्च) गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा ते मला गंभीर वाटले. पण आता सत्य समोर आले आणि या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.

आरोप प्रथमदर्शनी गंभीर वाटल्यानंतर शरद पवार यांनी संबंधिताला क्लीनचिट दिल्याचा प्रकार काही नवीन नाही. सुमारे दोन महिन्यांपूर्वी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने थेट बलात्काराचा आऱोप झाला होता. आपण एक महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्याच महिलेच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. त्यावेळी भाजपाने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

धनंजय मुंडे यांना शरद पवार यांनी क्लीनचिट दिली. आरोप करणार्‍या व्यक्तीवरच एकाहून अधिक आरोप झाले आहेत. त्यामुळे याबाबतची सत्यता जाणून घेण्याची गरज आहे. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार म्हणाले होते. विशेष म्हणजे, आदल्या दिवशीच त्यांनी मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचे म्हटले होते. आताही माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. याप्रकरणात पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बार्डो ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

रश्मी शुक्लांनीही देशमुखांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला; परमबीर सिंहाचा याचिकेत दावा