in

Petrol and Diesel price | पाहा आजचे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती

गेल्या महिन्यात सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता सलग 25 व्या दिवशी स्थिर राहिल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 97.57 रुपये इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 88.60 रुपये इतकी आहे. दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे 91.17 आणि 81.47 रुपये इतकी आहे.

देशातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर
मुंबई
पेट्रोल- 97.57 रुपये/लिटर
डिझेल- 88.60 रुपये/लिटर

दिल्ली
पेट्रोल- 91.17 रुपये/लिटर
डिझेल- 81.47 रुपये/लिटर

कोलकाता
पेट्रोल- 91.35 रुपये/लिटर
डिझेल- 84.35 रुपये/लिटर

चेन्नई
पेट्रोल- 93.11 रुपये/लिटर
डिझेल- 86.45 रुपये/लिटर

देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत) इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation : इंद्रा सहानी निकाल ‘लक्ष्मणरेषा’ नाही… कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

‘संघजीवी’ अधिकाऱ्यांचे कारस्थान? काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा