in

Petrol Diesel Price | सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थै!

आज देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती त कोणतीही वाढ झालेली नाही. आजही दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 101.84 रुपये, तर डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. मुंबईत आज पेट्रोल किंमत 107.83 रुपये आणि डिझेलची किंमत 97.45 रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 102.08 रुपये, तर डिझेलचे दर 93.02 रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल शंभरीपार पोहोचलं आहे. इथे पेट्रोलची किंमत 102.49 रुपये लिटर, तर डिझेल 94.39 रुपये लिटर आहे.

पेट्रोलच्या दरांत चार मेनंतर 41 वेळा वाढ झाली. तर डिझेलच्या दरांमध्ये 37 वेळा वाढ झाली, तर एकदा दरांमध्ये घट करण्यात आली. सलग तेलांच्या किमतींमध्ये होणाऱ्या वाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरनं महाग झालं आहे. डिझेल राजस्थान, ओदिशा आणि मध्यप्रदेशातील काही शहरांमध्ये 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर :

शहरं पेट्रोची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर
दिल्ली – 101.84 – 89.87
मुंबई – 107.83 – 97.45
चेन्नई – 102.49 – 94.39
कोलकाता – 102.08 – 93.02

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ashadhi Wari 2021 | संत मुक्ताई पालखीचं मुक्ताईनगरहून पंढरपूरकडे प्रस्थान

वासिंद पुर्व पश्चिम भागाला जोडणारा रेल्वे पुल पाण्याखाली