in ,

पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ सुरुच, जाणुन घ्या आजचे दर

पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ सतत सुरुच आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना झटका दिला आहे. आज पेट्रोल-डिझेल दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 102.13 रुपये मोजावे लागत आहेत.

आज पेट्रोल-डिझेल दरात वाढ करण्यात आली आहे. आज पेट्रोल दरात 35 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे. तर डिझेलही 35 पैशांनी महागले आहे. या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोल प्रति लीटर 105.14 रुपये, तर डिझेल 93.87 रुपये प्रति लीटर झालं आहे. मुंबईत पेट्रोल 34 पैसे प्रति लीटर महागले आहे. तर डिझेल दरात 37 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल दरात या महिन्यात जवळपास दररोज वाढ झाली आहे. या महिन्यात केवळ 10 दिवसांत पेट्रोल दर 2.80 रुपयांनी महागले आहे, तर डिझेल दरात 3.30 रुपये वाढ झाली आहे.

दररोज सकाळी 6 वाजता भारतामध्ये इंधनपुरवठा करणार्‍या कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले जातात. त्यानुसार प्रत्येक राज्यामध्ये कर प्रणाली पाहता पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात. भारतामध्ये राज्यागणिक पेट्रोल, डिझेलचे दर वेगवेगळे असतात. वॅटचा दर प्रत्येक ठिकाणी वेगळा असल्याने इंढन दर वेगळे असतात. देशात सर्वाधिक व्हॅट राजस्थान त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवसेनेनं वाहनचालकांना वाटले झंडू बाम आणि मास्क

BiggBoss Marathi | ‘आदिश वैद्य’ आहे तरी कोण?