in

पेट्रोल-डिझेलचे भाव 15 दिवसांनी घटले

देशात अखेर 15 दिवसांनंतर इंधन थोडं स्वस्त झालं आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी गुरुवारी म्हणजे 15 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये 16 आणि 14 पैशांची घट झाली आहे. याआधी 30 मार्च, 2021 रोजी घट झाली होती, त्यानंतर तेलाचे दर सलग बरेच दिसत स्थिर होते. आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे. गेल्या काही आठवड्यात चढ-उतार असले तरी दर बदलले नव्हते.

आजच्या दर कपातीनंतर आता दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.56 रुपयांवरून 90.40 प्रति लीटर झाले आहे. डिझेल 81.10 हून घटवून 80.73 रुपये प्रति लीटर झाले आहे.

मुंबईत पेट्रोल 96.98 रुपये होते आता 96.83 रुपये प्रति लीटर झाले आहे आणि डिझेलही 87.96 रुपयांवरून सस्त होऊन 87.81 रुपये प्रति लीटर झाले आहे. चेन्नईत पेट्रोल 92.58 रुपयांवरून 92.43 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 85.88 रुपयांवरून 85.75 प्रति लीटर विकले जात आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 90.77 रुपयांवरून 90.62 रुपये आणि डिझेलची किंमत 83.75 कमी होऊन 83.61 रुपये प्रति लीटर झालं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Share Market | मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत 450 अंकांची घट

7th Pay Commission| केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या पगारात होणार ‘हा’ मोठा बदल