in

पेट्रोल परवडत नाही, 80 लाखांची गाडी कशावर चालणार; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला

प्रशांत जगताप | सातारा | उदयनराजेंना पेट्रोल परवडत नाही ही बाब शॉकिंग आहे मग उदयनराजेंनी 70, 80 लाखांची गाडी घेतली ती कशावर चालणार,असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंना लगावला. कोणाला कस लोळायच आहे हा त्यांचा प्रश्न आहे, मी जबरदस्ती करू शकत नाही. मात्र नगरपालिकेत लोळावण्याचा प्रकार करू नका. साताऱ्यातील जनतेला गेल्या 5 वर्षात पालिकेचे उठावदार काम दिसले नाही. उदयनराजेंनी समोरासमोर या अशा आवाहनाला उत्तर देत ”मी उदयनराजेंच्या समोरच राहतो मग समोरासमोर येऊन करायचं काय? ही वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे. उदयनराजे यांच्या डायलॉगबाजीवर सातारकर नागरिक पडदा टाकणार आहेत असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

खासदार उदयनराजेंनी बलात्कारी आणि राज्यकर्त्यांचा कडेलोट करणार असे विधान केले होते. यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले. कुणाचा कडेलोट करणार हे मला माहित नाही. मागील विधानसभा निवडणुकीत माझा कडेलोट करणार हे मतदारांनी ठरवले असते तर माझा कडेलोट झाला असता. कोण निवडून आले आणि कुणाचा पराभव झाला मतदारांनी कोणाचा कडेलोट झाला अशी बोचरी टीका उदयनराजेंचे नाव न घेता केली आहे.

नगरपालिकेचे काम स्वच्छ असत तर आरोप-प्रत्यारोप करण्याची गरज पडली नसती. जे चुकीचं घडतंय ते बोलणे गरजेचे आहे. वर्षाची आणि आताची राज्यसभेची खासदारकी ही पुणे-सातारा हायवे सरळ करू शकला नाही. महाराजांनी लक्ष घालून निदान सातारकरांसाठी टोल माफ करून घ्यावा. आनेवाडी टोलनाका हस्तांतरण वरून जो वाद झाला होता त्या भांडणासाठी कोजागिरीला माझ्या घरापर्यंत लोक आली होती. घोड्याच्या पुतळ्यावर चढणाऱ्या वसमतच्या आमदारांना पक्षाने योग्य ती समज दिली पाहिजे. घोड्यावर चढून हार घालणाऱ्या आमदारांवर कारवाई झाली पाहिजे असे छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शेतकऱ्यांचे महामार्गावर मृदुंग वाजवत भजन आंदोलन

समीर वानखेडेंना मुंबई पोलिस पाठवणार समन्स