in

Petrol Rate today | जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

सार्वजनिक कंपन्यांनी जाहीर केलेली इंधन दरकपात संपूर्ण देशासाठी लागू आहे. अर्थात, प्रत्येक राज्यात इंधनांवर वेगवेगळा कर आकारला जातो. त्यामुळे राज्याराज्यांतील नवे इंधन दर भिन्न असतील.

आता दिल्लीत पेट्रोलचा दर 90 रुपये 40 पैसे, तर डिझेलचा दर 80 रुपये 73 पैसे इतका झाला आहे. मुंबईत पेट्रोल 96 रुपये 83 पैशांत, तर डीझेल 87 रुपये 81 पैशांत उपलब्ध होईल. केंद्राने मागील मार्चमध्ये इंधनांवरील उत्पादन शुल्क वाढवले. तेव्हापासून लिटरमागे पेट्रोल 21 रूपये 58 पैशांनी, तर डिझेल 19 रूपये 18 पैशांनी महागले. तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर पेट्रोल आणि डीझेल प्रथमच चालू वर्षी 24 मार्चला स्वस्त झाले.

तेव्हापासून चारवेळा मिळून पेट्रोल 77 पैशांनी, तर डीझेल 74 पैशांनी स्वस्त झाले आहे. दरवाढीच्या तुलनेत दरकपात अगदीच माफक स्वरूपाची आहे. त्याशिवाय, विधानसभा निवडणुकांच्या काळात संबंधित दरकपात झाल्याकडेही विरोधी पक्ष लक्ष वेधत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कुंभमेळ्यातून परतणाऱ्यांचा शोध सुरू

Medical Oxygen | ऑक्सिजनचा तुटवडा, परदेशातून आयातीचा केंद्राचा निर्णय