in

‘रावसाहेब’ चे मोशन पोस्टर रिलीज…

‘प्लानेट मराठी’ ने आणखी एक चित्रपटाची घोषणा केली आहे. रावसाहेब अस ह्या चित्रपटाच नाव असून त्याच मोशन पोस्टर सोशल मिडीयावर शेअर केल आहे, ‘श्श..! काळजाची धडधड थांबलिये.. कुणीतरी येतंय,’
“रावसाहेब” ह्या मोशन पोस्टर मध्ये वाघ, हत्ती, हरीण, लांडगा असे प्राणी एकत्र दिसून येत आहेत, याची निर्मिती प्लानेट मराठीची असून प्लानेट मराठी चे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर, याबरोबर नेहा पेंडसे बायस, जितेंद्र जोशी, निर्माते आहेत आणि निखील महाजन ने दिग्दर्शनाबरोबरच निर्मितीची हि जबाबदारी घेतली आहे.जितेंद्र जोशीने हि त्याच्या इन्स्टाग्राम वर ‘निखील सोबत चा माझा पुढचा चित्रपट ‘आणि रावसाहेब चित्रपटाचे पोस्टर पोस्ट केला आहे.

या चित्रपटाचे लेखन प्राजक्त देशमुख श्रीपाद देशपांडे आणि निखील महाजन याने केले आहे.तसेच निखील महाजन लेखक, दिग्दर्शक, आणि निर्मिता या तिरंगी भूमिकेत दिसतोय, हा चित्रपट २०२२ मध्ये येणार आहे असे जाहीर केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs ENG : इंग्लंडच्या कसोटी संघाची घोषणा

अंबरनाथमध्ये पुलाचे रेलिंग्ज तुटल्याची घटना; वाहतूकदारांना अपघाताची भीती