in

‘लस घेताच कोरोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो’

pm-modi

अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाविरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पावसाळी अधिवेशनाआधी नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लस घेताच करोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं सांगत लस घेण्याचं आवाहन केलं.

“मी आशा करत आहे की तुम्ही सगळ्यांनी लसींचा कमीत कमी एक डोस घेतला असेल. तरीही तुम्ही करोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करा. लस ही हातावर(बाहु) देण्यात येते आणि जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता. करोनाविरुद्धच्या लढाईत जर तुम्हाला बाहुबली बनायचे असेल तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल. आता पर्यंत ४० कोटी पेक्षा जास्त लोकं करोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत. पुढे ही हे काम जोरात सुरु राहिल,” असे मोदींनी म्हटलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंढरपूरची वारी सर्वोच्च न्यायालयात; ठाकरे सरकारच्या निर्णयाला आव्हान

सुरक्षा दलाला मोठं यश; लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर चकमकीत ठार