in

MIDCबंद कंपनीतील साहित्य चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

प्रशांत जगताप | लोणंद : खंडाळा येथील स्पार्क ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये अज्ञात इसमांनी 3 सुरक्षा रक्षकांना मारहाण करून बांधून ठेवले. बंद कंपनीच्या आवारातील दीड लाख रुपये किमतीची 900मीटर लांबीची कॉपर वायर चोरी केली.

दरम्यान लोणंद पोलिसांनी सदर गुन्हा दाखल करून दोन पथके तयार केले. लोणंद शहरातील cctvच्या आधारे आणि गोपनीय बातमीदारामार्फत गुन्ह्यातील आरोपींना उत्तर प्रदेश, मुंबई व पुणे या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. सदर लोणंद पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो गाडी देखील ताब्यात घेत 4 आरोपींना अटक केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ATMमधून पैसे चोरणाऱ्या टोळीला बिहारमधून अटक

93 हजार एसटी कामगारांना सप्टेंबरचा पगार मिळणार; अनिल परब यांची माहिती