in ,

जळगाव पोलीस शिपाई भरती परीक्षेत स्मार्ट कॉपी

मंगेश जोशी, जळगाव | जळगाव शहर पोलीस दलाच्या १२८ पोलीस शिपाई जागेसाठी शिपाई भरती २०१९ मधील उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली असता, या परीक्षेमध्ये दोन उमेदवार गैरप्रकार करताना आढळून आल्याने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली. यापरीक्षेतली एका उमेदवार व्हाट्सअप वर प्रश्न उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनात आले. तर दुसऱ्या एका उमेदवाराने चक्क डिवाइस व ब्लूटूथ वापरून गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांना रंगे हाथ पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी पोलिस शिपाई भरती २०१९ ची लेखी परीक्षा घेण्यात आली. या लेखी परीक्षेत नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी कॉलेज, बांभोरी येथील परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी उमेदवार योगेश रामदास आव्हाड, जिल्हा नाशिक या उमेदवाराने मोबाईल द्वारे व्हाट्सअप वर प्रश्न पाठवून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केले असता त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला तर जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल येथील परीक्षा केंद्रावर दुसरे उमेदवार प्रतापसिंग गुलचंद बालोद याने चक्क मोबाईल सारखे डिवाइस तयार करून व कानात सुष्म ब्लूटूथ वापरून गैरप्रकार करत असतानाचे निदर्शनास आले असून याच्या विरोधात जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Band | कोल्हापुरात कॅन्डल मार्च; हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांचा सहभाग

विजेची तार अंगावर पडल्याने आठ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू