in

पोलीस शिपायाच्या प्रसंगावधाने वाचले प्राण

वसईच्या रेल्वे स्थानकात ट्रेन मधून पडलेल्या 10 वर्षाच्या मुलाचा पोलीस शिपायाने प्रसंगावधान दाखवत प्राण वाचवले आहे. मलेशी देवाप्पा एलगी (10) असे मुलाचे नाव आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. दरम्यान पोलीस शिपायाने दाखवलेल्या कर्तबगारीचे सर्वस्तरावर कौतुक होत आहे.

वसई स्थानकात सकाळी 11.15 वाजता चर्चगेट वरून आलेली लोकल थांबली होती. या ट्रेनचे चैन पुलिंग करण्यात आली. याची माहिती मिळताच स्टेशन कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई आदिनाथ ठाणांबिर गस्तीवर होते. त्यांनी कोचच्या दिशेने पळ काढला असता त्यांना त्या ठिकाणी 10 वर्षीय मुलगा फलाटांवर जखमी अवस्थेत पडलेला दिसला.

पोलीस शिपाई ठाणांबिर यांनी दोन डब्यांधील रिकाम्या जागेतून जखमी बालकास इतर प्रवाशांच्या मदतीने बाहेर काढत तात्काळ त्याला उचलून धावत रवी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल केल्याने त्याच्यावर त्वरित उपचार झाले.त्यामुळे त्याचा जीवाचा धोका टळला.

दरम्यान भाईंदर रेल्वे स्टेशन येथे कर्तव्यावर असणारे गुलाये, जाधव व झंजे यांनी तात्काळ नमूद बालकाच्या वारसांचा शोध घेऊन त्यांना हॉस्पिटल मध्ये पाठवले. मलेशी देवाप्पा एलगी असे त्याचे नाव असून भाईंदर पश्चिमेच्या उत्तन रोडवरील मुडदा खाडीजवळ झोपडपट्टीत तो राहतो.पोलीस शिपाई आदिनाथ ठाणांबिर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधामुळे आपल्या मुलाचे प्राण वाचल्याने आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी चित्रपटात दिसणार …