in ,

Porn apps Case | राज कुंद्रासह नेरूळमधून आणखी एकाला अटक!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सात ते आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कुंद्राला अटक केली. अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.

मात्र आता राज कुंद्रासह नेरूळमधून आणखी एकाला अटक केली आहे. रायन जाँर्न थाँर्प असे या आरोपीचे नाव असून हा नेरूळचा राहणारा आहे. मालवणी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं होतं. याप्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीलाही अटक केली होती. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला; ताबा घेताच अदानींचा निर्णय

Ashadhi Ekadashi 2021| यंदाही चंद्रभागा नदी किनारी शुकशुकाट