in ,

MPSC च्या परीक्षा पुढे ढकला; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना फोन

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी दोघांमध्ये परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आश्वासन दिले नसले तरी त्यांची भूमिका सकारात्मक असल्याचे समजते.

 एमपीएससीची पूर्व परीक्षा होणार आहे. गेल्याच महिन्यात परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. अनेक विद्यार्थ्यांना यापूर्वीच कोरोना झाला आह, तर परीक्षेचा ठिकाणी विद्यार्थ्यांना कोव्हिड विषाणूची लागण होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आता संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उन्नाव बलात्कार आरोपीच्या पत्नीला भाजपाकडून निवडणुकीचं तिकीट

‘मुंबईत केवळ एक दिवसाचा लससाठा शिल्लक’