वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी शंभर कोटी रुपये कसे वसूल केले हे स्पष्ट करण्यात आले आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी असला तरी त्यामध्ये नेक्सेस उभे राहिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
राज्यपालांची भेट घेऊन ठाकरे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर करणार आहेत. हे सरकार बरखास्त करावे मात्र सरकार बरखास्त करीत असताना सभागृह बरखास्त करू नये असेही ते राज्यपालांना सांगणार आहेत.असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
Comments
Loading…