in

आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच उशीरा बेड मिळाल्याने गर्भवतीचा मृत्यू

राज्यात बेड न मिळाल्याने कोरोना बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यात उशीरा बेड मिळाल्याने आठ महिन्याच्या गर्भवतीचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेने नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहेत. तसेच कदाचित लवकर बेड मिळाला असता तर तिचे प्राण वाचले असते, असे नातेवाईकांकडून बोलले जात आहे.

जालना तालुक्यातील नागेवाडीची रहिवासी असलेल्या मिना जाधव या आठ महिन्यांच्या गरोदर महिला कोरोना पाॅझिटिव्ह होती. तिला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यानं तिला जालन्यात आणण्यात आलं होते. मात्र जालन्यातील बेड हाऊसफुल असल्यानं त्या महिलेला तीन तास रुग्णवाहिकेतच काढावा लागला होता. त्यानंतर तिला बेड तर मिळाला मात्र आज सकाळी तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान तिला जर वेळेत बेड मिळाला असता तर तिचे प्राण वाचवता आले असल्याचे नातेवाईक बोलत आहेत. दरम्यान आरोग्य मंत्राच्याच जिल्ह्यात जर अशा घटना घडत असतील तर इतर जिल्ह्यांची काय अवस्था असेल असा प्रश्न जनसामान्यातून व्यक्त होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CSK vs PBKS : चेन्नईसमोर 107 धावांचे आव्हान

जळगावात ऑक्सिजन अभावी महिलेचा मृत्यू