in

चेंबूर, विक्रोळी दुर्घटना : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला शोक!

चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात 14 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर 6 ते 8 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत पाच घरे पडली आहेत. दोन घरांतून मलबा काढण्यात आला आहे. तर तीन घरांतील मलबा काढणे अद्याप बाकी आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या दुर्घटनांवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी टि्वट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा हजेरी लावली. मध्यरात्री १२ वाजल्यापासून पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत मुंबईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या तुफान पावसामुळे अनेक परिसर जलमय झाले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Chembur Wall Collapse: चेंबूरमध्ये भिंत कोसळून 17 जणांचा मृत्यू; विक्रोळीत 7, तर भांडूपमध्येही एक दगावला

चेंबूर, विक्रोळी दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून २ लाखांची मदत