in

व्हॉट्सॲपकडून युझर्सवर दबाव; प्रायव्हसी पॉलिसीच्या मुद्द्यावरून केंद्राचा आरोप

व्हॉट्सॲपची प्रायव्हसी पॉलिसी १५ मेपासून अंमलात आली. पण, व्हॉट्सअॅप आपल्या क्षमतांचा गैरवापर करत असल्याचा सरकारचा आरोप आहे.

केंद्र सरकारचे म्हणणे…
प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी युझर्सवर दबाव टाकला जात आहे
पॉलिसी स्वीकारण्यासाठी युझर्सना वारंवार नोटिफिकेशन पाठवले जात आहेत
भारतीय स्पर्धा आयोगाच्या २४ मार्च रोजीच्या आदेशाचे हे एक प्रकारचे उल्लंघनच आहे
व्हॉट्सॲप क्षमतांचा गैरवापर करत आहे
युझर्सना प्रायव्हसी पॉलिसीसाठी पाठवल्या जात असलेल्या नोटिफिकेशन्ससंदर्भात दिल्ली हायकोर्टाने व्हॉट्सॲपला हंगामी आदेश द्यावेत

काय आहे प्रायव्हसी पॉलिसी
युझर व्हॉट्सॲपवर जो कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड वा रिसीव्ह करतो त्या कंटेंटचा वापर व्हॉट्सॲप कुठेही करू शकेल, असे प्रायव्हसी पॉलिसीचा नियम सांगतो
तसेच व्हॉट्सॲप युझरचा डेटाही इतरत्र शेअर करू शकणार आहे
प्रायव्हसी पॉलिसीला युझरने नकार दिला तर त्याचे अकाऊंट निष्क्रिय केले जाईल, असे व्हॉट्सॲपने म्हटले होते. मात्र, नंतर व्हॉट्सॲपने हे म्हणणे मागे घेतले

व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी पॉलिसीचा युझर्सवर परिणाम
युझर किती खर्च करतो, कोणत्या गोष्टींवर अधिक खर्च करतो यावर लक्ष ठेवले जाईल आणि त्यानुसार युझरला जाहिराती पाठवल्या जातील
युझरच्या हातातील स्मार्टफोनच्या आयपी ॲड्रेसवरून त्याचा ठावठिकाणा लागणार
युझरचे स्टेटस पाहून व्हॉट्सॲप फेसबुकवर त्यास अनुरूप संदेश पाठवेल
कंटेंटवर लक्ष ठेवून त्याचे विश्लेषण केले जाईल आणि त्यानुसार जाहिराती वा व्यावसायिक संदेश पाठवले जातील
युझर कोणत्या ग्रुपवर किती सक्रिय आहे, यावरही व्हॉट्सॲप लक्ष ठेवेल

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ashiyana building | ओशिवारा येथील इमारतीला भीषण आग

राज्यातील लॉकडाउनवरुन विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण…