in

रशियाच्या Sputnik V लशीची किंमती जाहीर; एक डोस ‘एवढ्या’ रुपयांना मिळणार

रशियाची कोरोना व्हायरसवरील लस स्पुतनिक व्ही ची भारतातील किंमत जाहीर झाली आहे. रशियातून आयात केलेली ही लस भारतात 995.40 रुपयांना प्रति डोस मिळणार आहे. डॉ. रेड्डीज ही औषधनिर्माता कंपनी रशियाची ही लस भारतात बनविणार असून मेक ईन इंडियाची ही लस आणखी स्वस्त मिळण्याची अपेक्षा आहे.

स्पुतनिक व्ही ही लस भारतात मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस आहे. ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. डॉ. रेड्डीजने आज हैदराबादमध्ये पहिला डोस दिल्याची माहिती दिली. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडद्वारे डॉ. रेड्डीजने रशियासोबत करार केला आहे. यानुसार या लशीचे उत्पादन भारतात केले जाणार आहे.

रशियातून आयात केलेल्या या स्पुतनिक व्ही लसीची किंमत 948 रुपये प्रति डोस आहे. परंतू त्यामध्ये 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे या लशीची किंमत 995.4 रुपये होत आहे. यामुळे 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा डोस उपलब्ध होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

PM KISAN Yojana | मोदींकडून पीएम किसानचा 8 वा हप्ता जारी

”केंद्राप्रमाणे राज्याने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी”