in

Nashik Oxygen Leak| “…ही घटना हृदय पिळवटून टाकणारी”

नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने २२ रुग्णांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घटना हृदय पिळवटून टाकणारी असल्याचं म्हटलंय. एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असतानाच दुसरीकडे ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांना प्राण गमावावे लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

“नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याने घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्घटनेत लोकांना प्राण गमावावे लागल्याने मला प्रचंड दु:ख झालं आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या सद्गभावना मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत,” अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी नाशिकमधील घटनेसंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्यात.

रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही संवेदना व्यक्त केल्यात.

“नाशिकमध्ये टँकरमधून ऑक्सिजन गळती झाल्याने लोकांचा मृत्यू झाल्याचं ऐकून वाईट वाटलं. माझ्या सद्भावना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत,” असं गडकरींनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Nashik Oxygen Tank Leak | ऑक्सिजन लिकमुळे 22 रुग्णांचा मृत्यू

Nashik Oxygen Leak; दोषींना सोडणार नाही, सरकारचे चौकशीचे आदेश