in

Oxygen पुरवठ्यावर पंतप्रधानांचा मोठा निर्णय

देशात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दरम्यान, ऑक्सिजनच्या कमतरतेकडे पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केयर्स फंडातून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका उच्च स्तरीय बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत पीएम केयर्स फंड अंतर्गत यापूर्वीच मंजुरी दिलेल्या ७१३ PSA प्लान्टपैकी ५०० नव्या ऑक्सिजन प्लांट्सनाही मंजुरी देण्यात आली आहे. पीएम केयर्स फंडद्वारे ५०० नवे ऑक्सिजन प्लांट उभारले जातील आणि त्यात ऑक्सिजनचं उत्पादन लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्नही केले जातील. हे प्लांट जिल्हा मुख्यालय आणि टिअर २ शहरांच्या रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढवतील. हे प्लांट DRDO आणि CSIR द्वारे विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीनं स्थापन केले जातील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे ‘या’ ट्रेन रद्द

मनसेच्या ‘या’ नेत्याने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत