in , ,

पंतप्रधानांची 12 वीच्या परिक्षेबाबत बैठकीला सुरुवात..आज निर्णय होणार?

पंतप्रधानांची 12 वीच्या परिक्षेबाबत बैठकीला सुरूवात .. आज होणार निर्णय ?
12 वीच्या परिक्षेबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलवली आहे. बैठकीला सुरूवात झाली आहे. या बैठकीत १२ वीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणार आहे. 12 वीच्या परिक्षेबाबत अद्याप निर्णय झाला नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंचेत आहे. केंद्र सरकारने १२ वीच्या सर्व बोर्डाबाबत एकच निर्णय जाहीर कराव, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘जनता संवाद’मध्ये मांडली होती.

अनेक दिवसांपासून रखडलेल्या या प्रकरणावर आज पंतप्रधान मोदी बैठक घेत आहेत. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांची तब्येत खालावल्याने ते या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही. ३ तारखेला या संपूर्ण प्रकरणावरील याचिकेवर सर्वेाच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज पंतप्रधान दिल्लीत १२ वीच्या परिक्षेबाबत नक्की काय निर्णय घेतात, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“शरद पवारांनी नक्कीच फडणवीसांना मार्गदर्शन केलं असेल”

लिली अँटिबॉडी कॉकटेलला केंद्राची मान्यता!