in

“कोरोना काळात खाजगी रुग्णालये सर्वात मोठे उद्योग बनले आहेत” सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल

देशात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरली आहे. तरी या काळात खाजगी रुग्णालयांनी योग्य ते सहकार्य केले नाही, जास्त पैसे आकारले अशा अनेक तक्रारी समोर येत होत्या.याच पार्श्वभूमीवर कोरोना संकटात अनेक रुग्णालयांकडून गरिबांची झालेली लूट पाहता सर्वोच्च न्यायालयाने रुग्णालयांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत . रुग्णालये हे सर्वात मोठे उद्योग बनले आहेत. अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने खाजगी रुग्णालयांना सुनावले आहे.

जीवनाचं मूल्य दाखवून रुग्णालयांची भरभराटी होण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही. त्याऐवजी रुग्णालये बंद केलेली बरी.. अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारने काढलेल्या अधिसूचनेसंदर्भातील याचिकेवरील सुनावणीवेळी खासगी रुग्णालयांना धारेवर धरले आहे. रुग्णालये ही रिअल इस्टेट बिझनेस बनत आहेत, रुग्णांना संकटकाळात मदत करण्याऐवजी पैसे कमाविण्याची मिशन बनले आहेत. नर्सिंग होममधील कमतरतेला माफी देण्याचा काहीच अर्थ नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Video|‘क्राइम मास्टर गोगो’आला परत

MNS | पुण्यात मनसेची रेस्क्यू टीम