in

राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिविर पुरवठ्याचे योग्य नियोजन सुरू

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे रेमडेसिविरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात उत्पादित होणारा आणि इतर राज्यातून प्राप्त होणारा ऑक्सिजन राज्यातील जिल्ह्यांना सुरळीत आणि आवश्यकतेनुसार प्राप्त व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे (एफडीए) राज्यातील ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठ्याबाबतचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना देण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या सात कंपन्यांना महाराष्ट्र राज्यासाठी 4,73,500 रेमडेसिविरचा साठा दिनांक 21 एप्रिल 2021 ते 02 मे 2021 या कालावधीत उपलब्ध करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार दि. 30 एप्रिलपर्यंत 3,44,494 इतका साठा शासकीय व खाजगी रुग्णालयांना वितर‍ित झाला आहे,अशी माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Weather alert | राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता

देशातील ‘या’ १३ नेत्यांची केंद्र सरकारकडे मोफत लसीकरणाची मागणी