in ,

हाफकिनमध्ये होणार कोरोना प्रतिबंधक लस? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत राज्यात लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. हाफकिनमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन करण्याचा शासनाचा विचार असून त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली.

भारत बायोटेकने लस तयार करण्याचे तंत्रज्ञान हाफकिन इन्स्टिट्यूटला द्यावे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली होती. या पार्श्वभूमीवर लसउत्पादनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. पंतप्रधानांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मी हाफकिनबद्दल बोललो होतो. कोरोनाच्या लसीचे उत्पादन किंवा त्यासाठी फिल अॅण्ड फिनिश करण्यासाठी हाफकिनला जी मदत लागेल ती देण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

देशाला पोलिओमुक्त करण्यामध्ये हाफकिनचे महत्त्वाचे योगदान आहे. या संस्थेला पुन्हा ताकद देऊन, ही लस बनवणारी कंपनी आपण करू शकतो का? याचा आढावा घेतला. काय-काय लागणार आहे, याची माहिती घेतली. या संस्थेची क्षमता वाढवण्याची गरज असेल, तर राज्य सरकार त्यांच्या पाठिशी आहे. सध्या लस बनवणाऱ्या इतर कंपन्यांसोबत आपण इथे लस तयार करू शकतो का किंवा फील अँड फिनीश करू शकतो का? याचा आढावा आपण घेत आहोत, असे सांगतानाच पंतप्रधान मोदी यांच्याकडून अनुकूल प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

असंच काहीसं आवडलेलं…

Maratha Reservation: आणखी किती पिढ्यांपर्यंत आरक्षण सुरू ठेवणार? सर्वोच्च न्यायालयाचा प्रतिप्रश्न