in

अंबरनाथमध्ये सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली

अंबरनाथमध्ये सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र बिल्डरने सुरक्षात्मक उपायोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अंबरनाथ शहरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसामुळे पूर्वेच्या शिवालिक नगर सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळची भिंत शेजारी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कोसळली. या सोसायटीच्या मेन गेट समोरच खड्डा खोदून इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या भिंतीला आधार राहिला नव्हता. त्यातच आजच्या पावसामुळे भिंतीखालची माती खचून संपूर्ण भिंतच खड्ड्यात पडली. या ठिकाणी अनेक लहान मुलांचा वावर असतो त्यामुळे आता सोसायटीने आणि शेजारील बांधकाम करणाऱ्या बिल्डरने सुरक्षात्मक उपायोजना करण्याची गरज निर्माण झाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोल्हापुरात उभारलं लहान मुलांचे पहिले कोविड सेंटर

चीनच्या कुरापती सुरुच… भारतानंही केलं राफेल तैनात