in

मुंबईत मराठा कार्यकर्त्यांचे निषेधार्थ आंदोलन


मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ मराठा आंदोलक मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बांधणार होते. पण त्याआधीच या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यभरात मराठा समाजात असंतोषाची लाट आहे. केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारच्या भूमिकेवर मराठा समाजाकडून तसेच मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून शंका उपस्थित केल्या होत्या.

मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ मंत्रालयासमोर आंदोलन करून हे आंदोलक आपला निषेध जाहीर करणार होते. मात्र त्यापूर्वी पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असून, माता रमाबाई पोलीस स्टेशन मध्ये या आंदोलकांना नेण्यात आले आहे.मुंबईत मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात5 जूनला आंदोलनाचा इशाराशिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडली नसल्यानेच हे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप राज्य सरकारवर केला आहे.

त्याविरोधात 5 जूनला मराठा समाजाकडून मोर्चा काढला जाईल, असा इशारा विनायक मेटे यांच्याकडून देण्यात आला आहे. मात्र मराठा समाजाने कोरोना काळात कोणतेही मोर्चे काढू नयेत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, पुढील कायदेशीर लढाईसाठी राज्यसरकार तयार असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून मराठा समाजाला आवाहन करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Coronavirus | आतापर्यंत देशात तीन लाखांहून अधिक कोरोनामुळे मृत्यू

Maratha Reservation | संभाजीराजे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर