in

पोलिसांना कृतज्ञता अल्पोपहाराचे वाटप

कोरोनाकाळात पोलीस बांधव २४ तास बंदोबस्तावर आहेत. कोरोनासोबत दोन हात करतानाच नागरिक शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत आहेत की नाही हे देखील पाहत आहेत. आपल्या प्राणांची पर्वा न करता पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून ‘विनोद पाटील युवा फाऊंडेशन’ तर्फे मुलुंड विभागातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना ‘कृतज्ञता अल्पोपहाराचे’ वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्तावर असणाऱ्या शेकडो पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. त्याचप्रमाणे कोरोनाच्या या लाटेत सुद्धा संपूर्ण पोलीस दल कोरोनाशी दोन हात करत आहे. त्यांचे हे सामाजिक ऋण न फिटणारे आहेत.

“उन्हातान्हात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांपर्यंत आम्ही सामान्य नागरिक आपले ऋणी आहोत ही भावना पोहोचविण्यासाठी आम्ही ‘कृतज्ञता अल्पोपहार’वाटपाचे आयोजन केले.” असे मनोगत विनोद पाटील युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी व्यक्त केले. आतापर्यंत २०० पोलिसांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले असून आणखी दोन दिवस हे वाटप करण्यात येईल असे देखील विनोद पाटील यांनी सांगितले. यावेळी मुलुंड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ, दहशतवादीविरोधी पथकाचे अधिकारी सतीश पाटील, फाऊंडेशनचे संतोष शेट्टी आणि राहूल मेंगर आदी मान्यवर उपस्थित होते

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Dr Sanjay Oak:लहान मुलांचा कोरोनापासून कसा बचाव कराल ? पाहा डॉ. संजय ओक काय म्हणतायत…

मुस्लिम युवकांनी केले 923 हिंदूंवर अंत्यसंस्कार