in

“विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न”

आज दिल्लीत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नुकतेच राष्ट्रपती उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव चर्चेत होते.

त्यानंतर आता ही भेट होत आहे. यावर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय.

येत्या १९ जुलैपासून केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. १३ ऑगस्टपर्यंत हे कामकाज सुरू राहणार आहे. याआधीच विरोधकांना विश्वासात घेण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केल्याची चर्चा आहे. याला पृथ्वीराज चव्हाण यांनी दुजोरा दिलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेचा आवाज?’भोंगा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

“पूजा चव्हाण प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट अद्याप तपास अधिकाऱ्यांकडेच”