in

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; ‘स्वरभास्कर’ कार्यक्रमाने गणेशभक्त झाले मंत्रमुग्ध

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव उत्साहात सूरू आहे. या उत्सवाला गणेशभक्तांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवात गेल्या दोन दिवसापासून भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना स्वरवंदना देणारा ‘स्वरभास्कर’ कार्यक्रम उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमात पं. आनंद भाटे, पं. जयतीर्थ मेवुंडी, पं. रघुनंदन पणशीकर व पं. शौनक अभिषेकी यांनी सादरीकरण केले.या कार्यक्रमाने गणेशभक्त मंत्रमुग्ध झाले.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आहेत. यंदा या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. हा महोत्सव 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान असाच सूरू राहणार आहे. ‘स्वरभास्कर’ हा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना स्वरवंदना देणारा पं. आनंद भाटे, पं. जयतीर्थ मेवुंडी, पं. रघुनंदन पणशीकर व पं. शौनक अभिषेकी यांचा कार्यक्रम, ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांना समर्पित स्वरवंदना देण्यासाठी राकेश चौरासिया, अमर ओक, निलेश देशपांडे आणि वरद कठापूरकर यांचा ‘हरि–प्रसाद’, हृषिकेश रानडे, प्रियांका बर्वे, विश्वजित बोरवणकर, आनंदी जोशी यांचा कार्यक्रम लोकशाही न्यूजवर Lokshahi News आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या www.bhaurangari.com संकेतस्थळावर रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. त्यामुळे या ऑनलाइन महोत्सवाचा गणेशभक्तांनी मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन लोकशाही न्यूज यानिमित्त करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona | राज्यात २ हजार ७४० नवीन कोरोनाबाधित

‘राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष’; प्रवीण दरेकरांची जीभ घसरली