in

Pune Ganeshotsav 2021:श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायाचे दिमाखात विसर्जन

मोरयाचा जयघोष, ध्वजाची सलामी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि भंडाऱ्यांची उधळण अशा वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ‘श्रीं’ना निरोप देण्यात आला. शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळ असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायांचे विसर्जन दुपारी 2.30 वाजता झाले. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उत्सव मंडपात श्रींची आरती झाल्यानंतर विसर्जनाला सुरुवात झाली. ‘मोरया.. मोरया’च्या जयघोषात मूर्ती विसर्जन कुंडांकडे दाखल झाली. तर ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणरायांना निरोप दिला. यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे यांसह मानाच्या आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. विसर्जनापूर्वी गणरायांना ‘वाद्यवृंद’ या पथकाने ध्वजाची सलामी दिली. तर अखंडपणे चौघड्याचे वादन सुरू होते. यासह आरतीच्या वेळी मंदिरात कार्यकर्त्यांनी शंखनाद केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात नो एन्ट्री

IPL Updates : मुंबईच्या पलटनसमोर धोनीब्रिगेडचे आव्हान!