in

Pune MIDC Fire : कंपनी मालक निकुंज शहाला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पिरंगुट एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी कंपनी मालक निकुंज शहा (वय 39 रा. सहकारनगर) याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री त्याला अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.

निकुंज शहा याला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आगी प्रकरणी निकुंज शहा याच्यासह बिपिन शहा (वय 68) पुणे केयुर बिपिन शहा (वय 41) त्यांच्या विरोधातही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिरंगुट येथील एसव्हीएस अँक्वा टेक्नॉलॉजी कंपनीत सोमवारी दुपारी लागलेल्या आगीप्रकरणी कामगारांच्या मृत्यूला कंपनी मालकाला जबाबदार धरत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. आगीच्या या घटनेबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘ओळखपत्र नसलेल्यांचे लसीकरण कसे करणार?’

यंदा आषाढी वारी कशी होणार? मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय