उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सोबतच्या बैठकीनंतर पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदीचे आदेश काढले आहे. पहिल्याच दिवशी पुण्यात जमावबंदीचे जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन दरम्यान पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
भाजपने पुण्यात संचारबंदी व पीएमपीएमएल सेवा बंद या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. हा विरोध दर्शविण्यासाठीच खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक व अनेक कार्यकर्त्यांनी स्वारगेट येथील पीएमपीएलच्या ॲाफिस बाहेर आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
Comments
Loading…