पुण्यात मंगळवारी सकाळी लक्ष्मी रस्त्यावर अनेक व्यापारी राज्य सरकार व प्रशासनाच्या निषेध व्यक्त करणाऱ्या फलकांसह रस्त्यावर घोषणाबाजी केली. यावेळी अनेक व्यापारी वर्गाने गर्दी करत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणीही केली आहे.
कोरोनाचा वेगाने होणारा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन आक्रमक झाले असून कठोर पावले उचलत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिका प्रशासन यांच्याद्वारे शहरात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानांना सुरू ठेवण्यास परवानगी नाकारली आहे. याचाच निषेध म्हणून पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर विविध व्यापारी संघटनांनी प्रशासनाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला आहे.
याबाबत लक्ष्मी रस्ता व्यापारी संघटनेचे प्रशांत टिकार म्हणाले,प्रशासनाचा हा निर्णय सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर अन्याय करणारा आहे.आधीच अडचणीत सापडलेल्या व्यापारी वर्गाला या निर्णयामुळे खूप मोठा फटका बसणार आहे.सरकार व प्रशासनाने आमच्या भावनांचा व परिस्थितीचा विचार करावा. आम्हाला दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी.
Comments
Loading…