in ,

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत पुणे महानगरपालिकेनं घेतला मोठा निर्णय

कोरोना महामारीचा सगळ्यात जास्त शिक्षण क्षेत्राला फटका बसला. गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेले शाळा आणि कॉलेज आता पुर्वपदावर येत असल्याची चिन्हं दिसत आहेत. महाविद्यालयं खुली करा अशी अनेक संघटनांची मागणी होती. ती बघता सरकारने कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला असुन पुणे महापालिकेनं विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नाही. आता कॉलेज सुरू होत आहेत. त्यामुळे लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच लस देण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत दिली आहे.

लसीकरण न झालेल्या 18 वर्षांवरील विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी आपल्या पुणे महापालिकेमार्फत थेट महाविद्यालय परिसरातच लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. यासाठी महापालिका लवकरच विशेष मोहिम राबवणार असल्याची माहिती देखील मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

येत्या सोमवारपासून अर्थात 11 ऑक्टोबरपासून पुण्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली होती. विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरातच लस देण्याच्या महापालिकेचा हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरला आहे. महापालिकेच्या या विशेष मोहिमेला लवकरच सुरूवात होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा, प्रवासी महिलेवर बलात्कार

पुलावर गळफास घेऊन संपवले आयुष्य