in ,

पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा तीन नराधमांनी कोयत्याने गळा चिरून केली हत्या

चंद्रशेखर भांगे | पुणे : पुणे शहरातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवीमध्ये शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय मुलीचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. बिबेवाडीचा यश लॉन्स परिसरात ही घटना घडली.

14 वर्षीय अल्पवयीन तरुणी कबड्डीपटू होती. आज सायंकाळी ती मित्र मैत्रिणी सोबत कबड्डीचा सराव करत होती. ज्या वेळी त्या ठिकाणी आलेल्या एका तरुणाने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि सोबत आणलेल्या कोयत्याने आरोपीने क्षितिजाच्या गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या क्षितीजाचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपीने अत्यंत क्रूरपणे हा गुन्हा केलाय. त्यानंतर त्याने घटनास्थळीच कोयता आणि सोबत आणले शस्त्र टाकून देऊन पळ काढला.

दरम्यान आरोपी जवळ पिस्तूल देतील असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु गुन्हा करत असताना त्याला ते काढता आले नाही. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“टू-व्हीलर चालवण्यापेक्षा नगरपालिका व्यवस्थित चालवा”

पुणे हादरलं! एकतर्फी प्रेमातून 13 वर्षीय मुलीचा खून