in

पुष्पक एक्स्प्रेस दरोडा बलात्कार प्रकरण; सर्व आरोपींना अटक

सुरेश काटे, कल्याण-डोंबिवली | कानपूरहून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात इगतपुरी ते कसारा दरम्यान दरोडा टाकत प्रवाशांचे मोबाईल आणि रोख रक्कम हत्याराच्या धाकाने काढून घेणार्या दरोडेखोरांनी एका २० वर्षीय प्रवासी महिलेशी लगट करत तिच्यावर अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली होती. याप्रकरणी प्रवाशांनी एका आरोपीला पकडून दिले.त्यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी तातडीने आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत आरपींचा शोध सुरू केला.

या प्रकरणी शनिवारी आरोपींना अटक करण्यात आली होती.काल रात्री उशिराने आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली तर उर्वरीत तीन फरार आरोपीचा शोध कल्याण रेल्वे पोलिसांची पथके घेत होती. सर्व आरोपी इगतपुरी घोटी परिसरातील असल्याची माहिती मिळताच पोलिसाचे पथक मागील 24 तास या भागात आरोपीचा माग काढत होते. अखेर या प्रकरणातील आठ ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.अर्षद शेख, प्रकाश पारधी, अर्जुन परदेशी, किशोर सोनवणे, काशीनाथ उर्फ काश्या तेलंग, आकाश शेनोरे,धनंजय भगत उर्फ गुड्डू, राहुल आडोळे अशी आरोपींची नावे आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

निलेश राणेंचा शिवसेनेला झटका;पंचायत समितीमधील शिवसेनेच्या तीन सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Band | कोल्हापुरात कॅन्डल मार्च; हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांचा सहभाग