in

पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा, प्रवासी महिलेवर बलात्कार

दोन दरोडेखोर कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात ,फरार आरोपींचा शोध सुरू.

सुरेश काटे
इगतपुरी ते कसारा दरम्यान धावत्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये सात ते आठ दरोडेखोरांनी 16 प्रवाशांना लुटण्यासह एका महिलेवर बलात्कार  केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळच्या  सुमारास  घडली आहे. कसारा रेल्वे स्थानकावर उतरून आरोपी पसार झाले मात्र याच दरम्यान दोन आरोपींना प्रवशांनी मोठ्या धाडसाने पकडलं. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत  दोन  जणांना अटक केली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या आठ आरोपीमधील सात जण घोटी परिसरात राहतात तर एक आरोपी मुंबई येथे राहणारा आहे . या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास  पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली.  इगतपुरी स्थानकातून एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असताना आठ जण एक्स्प्रेस मध्ये चढले . एक्स्प्रेस ने इगतपुरी स्टेशन सोडताच या आठ जणांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण  करायला सुरुवात केली. 16  प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले त्याच्याकडून मोबाईल व रोकड हिसकावून घेतली  दरोडेखोर इथेच थांबले नाही तर त्यांनी पती सोबत प्रवास करणाऱ्या 20 वर्षीय महिलेची छेड काढत तिच्यावर बलात्कार केला. कसारा रेल्वे स्थानक येताच या दरोडेखोरांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला यामधील सहा आरोपी निसटले मात्र याच दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले.

आरोपींवर कारवाई

या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रकाश पारधी व अर्षद शेख असे या आरोपींच नाव आहे. हे आठ आरोपी एकमेकांचे मित्र असून यामधील सात जण घोटी मध्ये राहतात तर एक जण मुंबई येथे वास्तव्यास आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसाची पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत . कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे . याप्रकरणी  मध्य  रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी घटना घडल्यानंतर आम्ही घटना स्थळ न पाहता कल्याण जीआरपी मध्ये गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलेची तब्येत स्थिर आहे. आठ पैकी सात आरोपी  घोटीचे राहणार आहे, तर एक आरोपी मुंबईचा आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

का साजरा केला जातो नवरात्री उत्सव? जाणून घ्या काय आहे महत्त्व

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत पुणे महानगरपालिकेनं घेतला मोठा निर्णय