in

राधा यादवचा विश्वविक्रम; टी-20त केले 50 गडी बाद

भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, 20 वर्षीय फिरकीपटू राधा यादवने नवीन विश्वविक्रम रचला आहे. राधाने महिला टी-20 क्रिकेटमध्ये सलग 25 डावात किमान एक तरी गडी बाद करण्याचा विश्वविक्रम केला आहे. इतकेच नव्हे, तर ती टी-20 क्रिकेटमध्ये 50 गडी बाद करणारी जगातील तिसरी युवा गोलंदाज आणि भारताची पहिली गोलंदाज ठरली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघ 0-2 असा पिछाडीवर पडला. रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने भारताला 6 गडी राखून मात दिली. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाची कामगिरी अपेक्षेनुसार चांगली झाली नाही. मात्र, संघाची फिरकीपटू राधा यादवने टी-20 क्रिकेटमध्ये खास विक्रम आपल्या नावावर केले आहेत.राधाने महिला टी-20 क्रिकेटमध्ये सलग 25 डावात किमान एक तरी गडी बाद करण्याचा विश्वविक्रम केला आहे. इतकेच नव्हे, तर ती टी-20 क्रिकेटमध्ये 50 गडी बाद करणारी जगातील तिसरी युवा गोलंदाज आणि भारताची पहिली गोलंदाज ठरली आहे. कारकिर्दीचा 36वा टी-20 सामना खेळत राधाने ही कामगिरी केली. आफ्रिकेची लीझेल ली ही राधाची 50वी विकेट ठरली.

दरम्यान हा विक्रम करताना राधाचे वय 20 वर्ष 334 दिवस असे होते. सर्वात कमी वयात 50 फलंदाजांना माघारी धाडणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत बांगलादेश संघाची नाहीदा अख्तर अग्रस्थानी आहे. तिने वयाच्या 20 वर्षातच हा कारनामा आपल्या नावावर केला होता. तर, दुसऱ्या स्थानी इंग्लंड संघाची महिला खेळाडू सोफी एक्लेस्टोन आहे. तिने हा 20 वर्ष आणि 300 दिवस असे वय असताना ही कामगिरी केली होती. सोफीने आतापर्यंत 42 सामन्यात 61 गडी बाद केले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी काळाच्या पडद्याआड

परमबीर सिंह यांनी केली सुप्रीम कोर्टात याचिका दाखल