in

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; लाखांची रोकड हस्तगत

गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागातील नावपूर शहराजवळील मानस हॉटेल जवळील होता हा अड्डा

प्रशांत झवेरी

महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील नवापूर शहराजवळ अनेक बेकायदेशीर जुगार सुरू होते. स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन अहिरे यांच्या पथकानं मानस हॉटेलजवळील जुगार अड्ड्यावर धाड टाकत 16 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात गुजरात राज्यातील सुरत शहरातील काही प्रतिष्ठित व्यापारी यांचाही समावेश आहे.

पोलिसांनी या ठिकाणी केलेल्या कारवाईत दीड लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. धाड टाकली त्यावेळेस त्यातील काही जण पळून जाण्यात यशस्वी झाल्याने अटक झालेल्यांची संख्या कमी आहे. सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून पोलिसांनी केलेली ही कारवाई देखावा ठरू नये. या भागातील जुगार अड्डे बंद करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखानं झोपलाय’

दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी एसटी सज्ज